दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ज्या नागरिकांनी अद्यापर्यंत पहिला डोस तसेच पहिल्या डोसेनंतर दुसरा डोस घेतला नसेल अशा नागरिकांनी लवकरात लवकर कोविड लसीकरणाचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोविड लसीचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. सध्या जिल्ह्यात पहिला डोसचे प्रमाण 85 टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण 37 टक्के आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांनी प्राधान्याने लस घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.