कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्यावर प्रभाग समित्या व ग्रमस्तरीय समिती करावयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले परिपत्रक जारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१९: सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढत होत आहे. या अनुषंगाने शहरी भागासाठी गठीत करण्यात आलेल्या प्रभाग समित्या व ग्रामीण भागासाठी गठीत करण्यात आलेल्या ग्रमस्तरीय समितीने करावयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार कोविड संक्रमित प्रति रुग्णामागे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 25 नागरिकांचा शोध घेणे बंधनकारक आहे. कोविड संक्रमित रुग्ण सापडल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची 72 तासांच्या आत शोध घेण्यात यावा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण करावे. कोविड संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अथवा प्रवासात आलेले नागरिकांची हाय रिस्क व लो रिस्क अशी वर्गवारी करुन हाय रिस्कमधील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात यावी.

संपर्कात आलेल्या हाय रिस्क नागरिकांची जास्तीत जास्त कोविड तपासणी होईल याबाबत सुक्ष्म नियोजन करावे. संपर्कात आलेल्या नागरिकांना गृह विलीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण करणे बंधनकारक राहिल. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी शहरी भागासाठी मुख्याधिकारी नगर पालिका यांची असेल तसेच ग्रामीण भागासाठी ग्रामस्तरीय समितीची असेल. त्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग संबंधित वैद्यकीय अधिकारी व आशा वर्कर यांची भूमिका महत्वाची असेल.

संपर्कात आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर, रॅट द्वारे टेस्ट करावी. यामध्ये आरटीपीसीआर ला प्राधान्य द्यावे. ज्या व्यक्तींना कोविड-19 लक्षणे (सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे इ.) आढल्यास त्यांची सुद्धा विहित मुदतीत कोविड तपासणी होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढलेली आहे अशा भागात घर टू घर सर्व्हेक्षण (तपासणी) करावी. तसेच कोविड संक्रमित रुग्णांची संख्या ज्या भागात, क्षेत्रात, ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी पुरवठा करणारे दूध विक्रेते, भाजी विक्रते, दुकानदार यांची तात्काळ रॅट टेस्ट करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!