दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । सातारा । कोविड-19 मुळे एक पालक/दोन पालक गमावलेल्या बालकांना घरातील कर्ता पुरुष मृत्यु पावल्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तसेच बालकांना शाळेमध्ये दाखल करण्यासाठी शैक्षणिक फी, शैक्षणिक साहित्य तसेच वसतिगृह शुल्क इत्यादीकरीता आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. एक पालक/दोन पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक प्रवाहामध्ये खंड पडून शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता सामाजातील दानशूर व्यक्ती, मंडळे, सामाजिक संस्था, विविध संघटना, रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, चॅरिटेबल ट्रस्ट, सीएसआर कंपनी यांनी अशा बालकांचे पालकत्व स्विकारुन शैक्षणिक फी, शैक्षणिक साहित्य, वसतिगृह शुल्क भरण्याकरीता सढळ हाताने आर्थिक मदत करावी. मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, एस.टी. स्टँड जवळ, सातारा दूरध्वनी क्र. 02162-237353 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.