
दैनिक स्थैर्य । दि.०६ मार्च २०२२ । सातारा । सातारा जिल्हा प्रशासनाने 14 वाळू ठेक्यांच्या लिलावाची प्रक्रिया 14 मार्च रोजी निश्चित केली आहे या लिलावाच्या माध्यमातून प्रशासनाच्या तिजोरीत चार कोटी रुपयांचा महसूल जमा होणार असल्याची सूत्रांनी ही माहिती दिली आहे वाळू लिलावाची किंमत कमी करण्यात आल्याने या लिलावाला जिल्ह्यातील ठेकेदारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या पात्रातील वाळू व अन्य खनिज यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते मात्र हे खनिज गैरमार्गाने उत्खनन करण्याचे प्रकार घडत असल्याने महसूल विभाग अत्यंत सतर्क होऊन धोरणात्मक पावले टाकत आहे लिलावासाठी जास्तीत जास्त वाळू उपलब्ध होण्याकरिता शासनानेच वाळू निलाव देण्याचे धोरण निश्चित केले आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कृष्णा माणगंगा नीरा दक्षिण मांड वसना या सहा नद्यांमधील वाळूचा लिलाव 13 मार्च रोजी घेतला जाणार आहे याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी प्रभात शी बोलताना दिली ते म्हणाले या लिलाव प्रक्रियेमध्ये शासनाच्या बोली किमती इतक्या किंवा त्यापेक्षा थोड्याशा कमी किमतीला हे लिलाव दिले जातील ास्तीत जास्त बोली बोलणार्याला अनामत भरून हे लिलाव घेता येतील लिलावाच्या बोलीची रक्कम तीन हजार 900 रुपये प्रति बस इतकी होती त्यावर बोली लावून वाळूज विक्री किंमत आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत होती मात्र लिलावाच्या माध्यमातून एका विशिष्ट किमतीला वाळूचे डेपो निश्चित करून दिले जातील जेणेकरून ठेकेदारांचा तोटा होणार नाही अशा अटी शर्ती घालण्यात आले आहेत या वाळू ठेक्यांच्या ची शासनाला अपेक्षित किंमत दोन कोटी 53 लाख इतकी आहे मात्र स्पर्धात्मक पद्धतीने लिलाव प्रक्रिया झाल्यास कमीत कमी चार कोटी रुपयांचा महसूल या लिलावाच्या माध्यमातून येणे गृहीत धरले जात आहे.