दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा कारागृहामध्ये समता फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून बंद्यांचे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये बंद्यांचे डोळे तपासून त्यांचे नंबर, मोतीबिंदू अशा सर्व बाबींची तपासणी करून त्यावर औषधोपचार करण्यात आला. या शिबीरामध्ये कारागृहातील एकूण 64 बंद्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
यापैकी एकूण 33 बंद्यांना चष्मा लागला असून, चष्मे समता फाउंडेशन यांच्याकडून विनामूल्य बंद्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय आयुक्त, सातारा चंदा ढबाले या होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते बंद्यांना मार्गदर्शन करून, कारागृहामध्ये विविध वैद्यकीय सुविधांची उपयोजना या कार्यालयामार्फत देखील करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते बंद्यांना चष्मा वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, समता फाउंडेशनचे सुहास लाटकर, तुरुंग अधिकारी राजेंद्र भापकर, सुप्रिया कुंठे, वरिष्ठ लिपिक प्रशांत लाड, नानासो डोंगळे, हवालदार सुरेश पाटील, मानसिंग बागल, राकेश पवार उपस्थित होते.