
![]() |
वर्धन अँग्रो कारखान्याच्या वतीने कामगारांना सँनेटायझर ,मास्क वाटप करताना विक्रमशील कदम,अभिजित डुबल, वैभव नलावडे, चंद्रकांत खराडे व अन्य. |
स्थैर्य, औंध, दि.२५: वर्धन अँग्रो कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरती कोरोना सारख्या वैश्विक महामारीमध्ये ऊस तोडीस येणारे मजूर, ट्रॅक्टर ड्रायव्हर यांच्या सुरक्षितते साठी कारखान्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डूबल यांचे हस्ते मास्क व सॅनिटाइझर वाटप करण्यात आले.
या वेळी पत्रकारांशी बोलताना कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले की कारखाना चालू झालेला आहे परजिल्हातील मोठ्या प्रमाणावर ऊस तोड करणारा मजूर ऊस तोडणी साठी आला आहे. आलेल्या सर्व मजुरांची कारखाना व्यवस्थापन चांगल्या रितीने काळजी घेत आहे. कारखान्याच्या वतीने सगळ्या ऊस तोडणी मजुरांचे आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच येणारा मजूर हा कारखान्याचा घटक समजून आवश्यक ती काळजी घेत आहोत. मजुरांना जास्तीत जास्त सुरक्षित वाटेल अश्या पद्धतीने कारखाना व्यवस्थापन दखल घेत आहे. कारखान्यात कार्यरत असणाऱ्या सगळया कर्मचाऱ्या बरोबर ऊस तोडणी साठी आलेल्या सगळ्या मजुरांचा विमा उतरवला आहे. कमी कालावधीत कारखान्याला लोकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी शेती अधिकारी वैभव नलावडे, इडीपी मॅनेजर चंद्रकांत खराडे, हरून संदे,तोडणी वाहतूक कंत्राटदार, ट्रॅक्टर ड्राइव्हर, ऊस तोडणी मजूर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.