स्थैर्य, फलटण, दि. ०३ : तालुक्यातील अलगुलेवाडी या गावामध्ये गरजू व होतकरू लोकांना क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप नुकतेच प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. मास्क व सॅनिटायझर मोफत उपलब्ध करून दिल्या बद्दल क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांचे विशेष आभार अलगुलेवाडी ग्रामस्थांनी मानले.
अलगुलेवाडी ता. फलटण येथे क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार, प्रतिष्ठानचे सहकारी उद्घट्टी, पोपट नरुटे, आप्पासो शेंडगे, अलगुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मंगल शिंदे, सौ. रुपाली तावरे, हनुमंत नाळे, हनुमंत शेंडगे, सौ. लता शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिसूर्य प्रतिष्ठाणची स्थापना संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केलेली आहे. समजतील वंचित घटकाला सर्वतोपरी मदत करण्याच्या हेतूने क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे कामकाज चालते. कोरोनाच्या काळामध्ये क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील उपेक्षितांना भरीव मदत करण्यात आलेली आहे. आगामी काळात सुद्धा श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या मागर्दर्शनाखाली क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे व संपूर्ण क्रांतिसूर्य प्रतिष्ठाणची टीम कार्यरत राहील असा विश्वास सुद्धा प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार यांनी या वेळी व्यक्त केला.