दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२३ | फलटण |
महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ या दिवशी झाला होता. त्यानंतर अनेक वर्षे हा दिवस ‘समता दिन’ तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून पिंपरद (फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समितीच्या वतीने संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याला त्या महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या घटनाना पुन्हा उजाळा देत नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर २० मार्च २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांना लिंबू सरबत वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद (फलटण) या संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सातारा सर्कलचे अध्यक्ष शरद मोरे, संस्थेचे अध्यक्ष नीरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे यांच्यासह विनोद गायकवाड, अमित खुडे, प्रसन्न मोरे, समीर मोरे, विजय बनसोडे, राहुल मोरे, संतोष मोहिते, हनुमंत मोरे, बापू मोरे, इंद्रजीत मोरे, अभिजीत मोरे, कुमार मोरे, तानाजी जाधव, शिवा पवार, गजानन पवार, श्रीरंग मोरे, गोविंद मोरे, रवींद्र पालखे, संजय बनसोडे, साजन कांबळे, सर्वेद मोरे, राजदीप मोरे, शुभम बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, सुहान मोरे, आदी उपस्थित होते.