महिला व बालकल्याण विभागातर्फे श्री जानाई हायस्कूलमधील विद्यार्थिनीला मोफत सायकलचे वाटप


दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
महिला व बालकल्याण विभाग, पंचायत समिती, फलटण यांच्या वतीने वाडी, वस्तीवरील मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत सायकलचे वाटप करण्यात येते. या योजनेअंतर्गत आज श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री जानाई हायस्कूलमध्ये इयत्ता १० वी ब मधील टाकळवाडे गावची विद्यार्थिनी कुमारी पल्लवी खांडेकर हिला विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुरवसे मॅडम यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले.

यावेळी नीलकंठ निंबाळकर सर, वर्गशिक्षक झेंडे सर, वसव सर, बाचल सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!