स्थैर्य, मुंबई, दि. ०३ : दुर्धर अश्या कोरोना व्हायरस कोव्हिड- १९ या भयंकर महामारीच्या प्रादुर्भावामुळे सारा देश हादरला व ना कामधंदा, ना रोजगार, ना कार्यक्रम अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वसामान्य जनतेची त्याचप्रमाणे आंबेडकरी कलावंतांची मोठी कोंडी झाली, अश्या परिस्थितीत त्याना सढळ हस्ते मदतीचा हात पुढे करावा या सामाजिक भावनेतून सम्यक कोकण कला संस्था, महाराष्ट्र (रजि.) आणि बहुजन हितवर्धक कला संस्था (रजि.) यांनी एकत्रित येऊन लॉकडाऊन मुळे बेरोजगार झालेल्या गोरगरीब कलावंताना मदत करण्याचे आव्हान केले, त्या आव्हानास प्रतिसाद देत समाजातील प्रतिष्ठित, मान्यवर व विविध तालुका संघटना प्रमुखांनी अमूल्य असे योगदान देत संस्थेच्या उपक्रमास हातभार लावला, सदर मान्यवरांच्या मदतीने जमा झालेला निधी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सन्मानिय आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू आंबेडकरी कलावंताना तालुकानिहाय वर्गवारी करून आर्थिक मदतीच्या स्वरूपात पोच करण्यात आला, सदर उपक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष भगवान साळवी, अध्यक्ष भार्गवदास जाधव, कोकण अध्यक्ष चिंतामण जाधव, महासचिव राजाभाऊ तथा रामदास गमरे, संपर्कप्रमुख मंगेश जाधव, बहुजन हितवर्धक कला संस्थेचे (रजि.) कार्याध्यक्ष विठ्ठलजी तांबे, अध्यक्ष संतोष गमरे, सचिव दिनेश सावंत आणि इतर दोन्ही संस्थेचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले तसेच समाजातील प्रतिष्ठित, मान्यवर व विविध तालुका संघटना प्रमुखांनी संस्थेच्या व गरजू कलावतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बहुमूल्य मदत करत संस्थेस उपकृत केल्याबद्दल सम्यक कोकण कला संस्थेने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी दोन्ही संस्थेच्या वतीने सर्व सन्मानिय महोदयांचे जाहीर आभार प्रकट केले.
राजाभाऊ तथा रामदास गमरे (मराठी वृत्तपत्रलेखक)