
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । ठाकूरकी (ता. फलटण) येथील मूकबधिर विद्यालयात माजी सैनिक रामहरी पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत पिंगळे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद फुलवला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि खाऊ वाटप करण्यात आले. या किटमध्ये अन्नधान्य, तांदूळ, केळी, बिस्कीट, फरसाण, चॉकलेट यांचा समावेश होता.
कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक निकम, प्रा राजेश निकाळजे, सोनगाव सरपंच संतोष गोरवे, राजेंद्र आडके, सुनिल यादव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. राजेश निकाळजे यांनी पिंगळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
रामहरी पिंगळे म्हणाले, देशसेवा केल्यानंतर समाजसेवा करण्याची संधी मिळते हे माझे सौभाग्य आहे. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती व ती पूर्ण झाली.
निकम म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी या प्रकारची मदत अत्यंत मोलाची आहे. त्यांच्या चेहर्यावरचा आनंदच श्री पिंगळे यांच्या उदारतेचे खरे प्रतिक आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्री रामहरी पिंगळे यांचे समाजसेवेचे कार्य प्रेरणादायी आहे. इतरांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.