दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
सोनगाव येथे ‘एक हात माणुसकीचा’ या उपक्रमातून परिसरातील ऊस तोडणी मजुरांना सर्व तरुण मंडळ सोनगावच्या वतीने दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
सर्वसामन्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ऊन, वारा, थंडीमध्ये ऊस तोडण्याचे काम करणार्या ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने सोनगाव बंगला येथील तरुणांनी एकत्र येऊन दिवाळी फराळचे किट वाटप केले.
ऐन दिवाळीत आपले घरदार सोडून शेकडो किलोमीटर दूरवरून आपल्या गावात आलेल्या आणि इच्छा असतानाही प्रतिकूल परिस्थितीमुळे दिवाळी फराळापासून वंचित असलेल्या ऊस तोडणी मजूर व त्यांची लहान चिमुकली मुले यांना ‘भाऊबीज’ या सणाचे औचित्य साधत गावात आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
सोनगाव बंगला येथील सर्व तरुणांनी आपापल्या घरी तयार केलेले दिवाळी फराळ एकत्र करून त्यांचे किट तयार केले. यामध्ये लाडू, करंजी, शंकरपाळी, कापणी, शेवचिवडा असे पदार्थ एकत्र करून हे किट तयार केले व परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या कोपीवर व उसाच्या फडामध्ये जाऊन वाटप करण्यात आले.
या उपक्रमामध्ये राजेश निकाळजे, पोपटराव बुरुंगले, दिलीप भंडारे, रमेश जगताप, रामहरी पिंगळे, रमेश मदने, राहुल गायकवाड, गणेश कांबळे, राजेंद्र आडके, बाळासो गायकवाड, दत्तात्रय ननावरे, हनुमंत थोरात, संदीप पिंगळे, राजेंद्र टेंबरे, अरुण लांडगे, लखन पिंगळे, संतोष आडके, सुरेश पवार, अक्षय खांडेकर, शिवजी ढवळे, सुधीर ओवाळ, ज्ञानेश्वर लवटे, संतोष गोरवे, अमोल सस्ते, चंद्रकांत तुपे, गणेश नामदास, हरीचंद्र गोरवे, संजय वाघ, शशिकांत मोरे, शंकर पिंगळे, चंद्रकांत निकाळजे, धर्मराज लांडगे, कोंडीबा लांडगे, पवन भोसले, ज्ञानेश्वर कोकरे, जयवंत शेलार, गणेश यादव, रोहन शेंडे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या कार्यास सर्व तरुण मंडळ, ग्रामपंचायत सोनगाव, विविध कार्यकारी सोसायटी सोनगाव या सर्वांचेही सहकार्य लाभले.