दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । पलूस । आज सोमवार दि.२५/४/२०२२ रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे जंतनाशक गोळ्या वाटप व विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याविषयी कार्यक्रम संपन्न झाला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रा कडील आरोग्य सेविका मा. सारिका दरेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी,जेवणाविषयी कशी काळजी घ्यावी यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. याच वेळी पलूस जिल्हा परिषद शाळा नंबर 2 चा इयत्ता सातवीतील विद्यार्थी विश्व सुतार याने काल तुरची येथे झालेल्या कुस्ती मैदानात चटकदार कुस्ती करून दोन हजार रुपये बक्षीस मिळवल्याबद्दल शाळा नं २ व शाळा नं.१ यांच्यावतीने सत्कार करणेत आला.दोनही शाळांच्या वतीने विश्व ला खाऊसाठी पैसे दिले गेले. याप्रसंगी शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, मारुती शिरतोडे ,शैलजा लाड, जगन्नाथ शिंदे संभाजी पाटील तसेच तेजस्विनी जाधव सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते