स्थैर्य, गोखळी, दि. ९ : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२१ अंतर्गत एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थांना चावून द्यायच्या जंतनाशक गोळ्या अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
यावेळी गोखळी आरोग्य उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी शेख मॅडम, आरोग्य कर्मचारी एस. एन. लोंढे, ए. आर. शिंदे, आशा वर्कस सौ. दुर्गा आडके यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे महत्व सांगितले. तसेच शाळाबाह्य विटभट्टी, कातकरी, ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना जागेवर जाऊन १ ते ८ मार्चपर्यंत जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत. विद्यालयतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जंतनाशक गोळ्या या वेळी देण्यात आल्या.