150 पीपीई किट आणि 250 एन-९५ मास्कचे वाटप


स्थैर्य, कोल्हापूर, दि. 22 : सामाजिक बांधिलकी जपत टोप येथील क्रशर व्यावसायिकांच्या मदतीने टोप क्रशर असोसिएशनच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, प्रशासन व सफाई कामगार यांना उपयोगी असे दीडशे पीपीई किट व अडीचशे एन 95 मास्क वाटप करण्यात आले. पंचायत समिती सदस्य व असोसिएशनचे सचिव डॉ. प्रदिप पाटील, असोसिएशन अध्यक्ष प्रकाश पाटील, असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल पाटील व असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते हे किट इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व हातकणंगलेचे तहसिलदार प्रदीप उबाळे यांचेकडे देण्यात आले.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी डॉ. विकास खरात म्हणाले टोप क्रशर असोसिएशनने केलेली मदत हि मोलाची आहे. असेच मदतीसाठी नेहमी अग्रभागी रहावे असे अवाहन केले. वडगाव मंडल आधिकारी गणेश बरगे, धनाजी जाधव सर्व अधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!