के.बी.एक्सपोर्टच्या वतीने प्रभाग क्रं.६ मध्ये गरजू कुटुंबाना ११५ भाजीपाला किट्सचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. 20 : कोरोना आपत्तीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रभाग क्रं.६ मधील नागरिकांना विधानपरिषद सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.दिपकराव चव्हाण साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण चेअरमन मा.श्रीमंत रघुुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), जिल्हा परिषद, सातारा मा.अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे बहुमोल असे सहकार्य मिळालेच आहे. आज अशीच प्रचिती परत एकदा आली, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सस्तेवाडी ता.फलटण येथील के.बी.एक्सपोर्टचे संचालक व गॅलेक्सी क्रेडिट को-ऑप.चे चेअरमन मा.श्री.सचिन यादव साहेब यांच्या सहकार्याने नगरसेवक मा.श्री.किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैया) आणि नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांच्या शुभहस्ते प्रभाग क्रमांक ६ मधील शुक्रवार पेठ (चाँदतारा मस्जिद पाठीमागील परिसर, सणगर गल्ली), शनिनगर येथील गरजू कुटुंबाना सुमारे “११५ भाजीपाला किट्स”चे वाटप करण्यात आले, यावेळी के.बी.एक्सपोर्टचे प्रशासकीय अधिकारी मा.श्री.हेमंत खलाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!