स्थैर्य, सातारा, दि.६: या वर्षी चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षीत पाणी साठा उपलब्ध असून शेतीसाठी व पिण्यासाठी रोटेशनप्रमाणे पाण्याचे वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
कालवा सल्लागार समितची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध आहेत याच्या वाटपाबाबत चांगल्या प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कॅनॉलच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी वाटपाच्या रोटेशन परिणाम होणार नाही यासाठी योग्य नियोजन करुन दुरुस्तीची कामे हाती घ्यावी. तसेच शेतकऱ्यांकडील थकीत पैशाच्या वसुलीसाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार अनिल बाबर यांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.