दातेवाडीत जंतूनाशक फवारणी


स्थैर्य, कातरखटाव, दि. २९ : दातेवाडी (ता.खटाव) येथे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या काजल भूषण देसाई यांनी स्वखर्चाने गावात नुकतीच जंतूनाशक फवारणी केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने गावच्या वेशीच्या आत कोरोनाला प्रवेश करता आला नव्हता. मात्र दुसऱ्या लाटेत आपण सर्वजण काळजी घेत असतानाही गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र या कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण झाशीच्या राणीप्रमाणे लढा देत असून आज संपूर्ण गावात जंतूनाशक फवारणी केली आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क व कार्यरत राहनार असल्याचे ही देसाई यांनी सांगितले.

यावेळी सरपंच गौरी पवार, उपसरपंच रंजना जाधव, ग्रामसेवक समीर शेख, चेअरमन तानाजी मोरे, भूषण देसाई, अशोक देसाई, दादा मोहिते, बाबासो पवार, सत्यवान माळवे, भीमराव पवार आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!