उत्तर कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकतीच निवडणूक झाली यामध्ये पिंपोडे बुद्रुक गावचे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे हे नगरी पतसंस्था व बँका या प्रवर्गामधून निवडणूक लढवून भरघोस मताने विजयी झाले याबद्दल उत्तर कोरेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी मा.संचालक रामभाऊ लेंभे यांचा पिंपोडे बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात सत्कार घेण्यात आला.

तसे पाहिले तर यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला रामभाऊ लेंभे यांच्या रूपाने सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून याचा मोठा फायदा बँकेला व  शेतकरी, कष्टकरी, कर्मचारी वर्गाला मिळणार आहे. या निवडणुकीत या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण सातारा जिल्हा असल्याने प्रत्येक मतदारांनी स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या उमेदवारालाच आशिया खंडातील नंबर १ ची बँक असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून निवडून दिले.

या बाबींचा आढावा घेवून उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने बँकेचे नूतन संचालक रामभाऊ लेंभे यांचा सत्कार घेण्यात आला यावेळी श्रीनिवास पवार, सूर्यकांत निंबाळकर, कमलाकर खराडे, संजय कदम, शैलेश धुमाळ, संतोष धुमाळ, रेवनसिद्ध महाजन, मुकुंदराज काकडे, बापू दोरके, प्रकाश कुंभार,अतुल वाघ, रणजित लेंभे, राहुल लेंभे, तेजस लेंभे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!