जिल्हा वार्षिक योजना निधीतून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला भोर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

स्थैर्य, पुणे दि.24 : पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील आरोग्य विषयक पायाभुत सुविधांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे सांगतानाच आपत्ती व्यवस्थापन निधी, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आणि सीएसआर निधीतून आरोग्यविषयक सुविधांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.

भोर पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी आ. संग्राम थोपटे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार अजित पाटील, भोरचे  पोलीस निरिक्षक मोरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. भोर येथे प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकलो, असे त्यांनी सांगितले. तसेच भोर तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनास यापूर्वी सहकार्य केले तसेच यापुढील काळात देखील असेच सहकार्य करावे असे सांगून नागरिकांचे कौतुक केले.

भोर उपजिल्हा रुग्णालयातील सोईसुविधांचे तातडीने बळकटीकरण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे सांगून  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेत नियोजन करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या बाहेरील नागरिकांच्या विलगीकरणासंदर्भात सूचना करुन  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जनजागृती करण्यात यावी. असे सांगितले. भोर उपजिल्हा रुग्णालयाकरीता ऑक्सीजन सुविधा, तसेच इतर  अत्यावश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जातील. भोर सारख्या दुर्गम भागात त्याचठिकाणी रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार होतील याकरीता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, लॉकडाऊन  शिथील करण्यात आले असले तरी कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापर तसेच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आवश्यक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करुन राष्ट्रीय महामार्गासंदर्भांतील अडीअडचणीचांही आढावा घेतला. तसेच खरीप हंगामातील खते, बियाणे वाटप स्थितीचा आढावा घेवून याचा तुटवडा भासणार नाही यादृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

आ. संग्राम थोपटे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवापूर येथील टोलनाका, भोर- वेल्हा तालुक्यातील शेतक-यांना खते, बि बियाण्यांचा पुरवठा, शेतीसाठीचा युरियाचा पुरवठा याबाबतच्या सूचना करुन पीककर्ज, विद्युत विभागांच्या प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी याबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येवून या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात  येईल असे सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!