ग्रेटाने टूलकिट शेअर केल्यानंतर दिशाने त्वरित तिला मॅसेज पाठवला होता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,नवी दिल्ली, दि.१६: ग्रेटा थनबर्ग टूलकिट केसमध्ये मंगळवारी अजून एक खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ग्रेटा थनबर्गने जेव्हा शेतकरी आंदोलनासंबंधीत टूलकिट ट्विट केली, याच्या तात्काळ नंतर कार्यकर्ती दिशाने तिला व्हॉट्सअप मॅसेज पाठवला होता. यामध्ये दिशाने ग्रेटाला म्हटले होते की, हे टूलकिट ट्विट करु नको, कारण यामध्ये सर्वांची नावे आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिशाने बनवलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपविषयीही माहिती मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इंटरनॅशनल फार्मर्स स्ट्राइक नावाचा हा ग्रुप शेतकऱ्यांशी संबंधित उपक्रमांना जोडण्यासाठी तयार करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की 6 डिसेंबर रोजी हा गट तयार करण्यात आला होता आणि त्यात 10 जणांचा सहभाग होता. नंतर दिशाने तिच्या फोनवरून सर्व नंबर डिलीट केले.

ग्रेटा आणि दिशा यांच्या झालेले व्हॉट्सअप संभाषण
ग्रेटा (9:25 pm): हे आत्ता तयार असते तर खूप चांगले झाले असते. मला यामुळे खूप धमक्या मिळाल्या असत्या. यामुळे तर मोठी समस्या निर्माण झाली.
दिशा : शिट…शिट…
दिशा (9:25 pm): मी हे तुला पाठवत आहे.
दिशा (9:35 pm): ओके, ही टूलकिट तू शेअर करणार नाही असे होऊ शकते का? काही वेळासाठी आपण काहीच बोलू नये असे होऊ शकते का? मी वकिलांसोबत चर्चा करायला जात आहे. मला माफ कर पण यामध्ये आमची नावे आहेत. आमच्यावर अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिवेंशन अॅक्ट (UAPA)नुसार केस होईल.
दिशा (9:39 pm): तु बरी आहेस ना?
ग्रेटा (9:40 pm): मला काही तरी लिहायला हवे.
दिशा (9:40 pm): तु मला 5 मिनिटे देऊ शकते का, मी वकिलांसोबत चर्चा करत आहे.
ग्रेटा (9:41 pm): कधी-कधी द्वेषाचे असे वादळं येतात आणि हे खूप भयानक असतात.
दिशा (9:41 pm): मी माफी मागते. आम्ही सर्व टेंशनमध्ये आहोत, कारण येथे परिस्थिती चिघळत आहे.
दिशा (9:41 pm): या प्रकरणात तुझे नाव पुढे येणार नाही याची आम्ही खात्री करू.
दिशा (9:41 pm): आपल्याला आता सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट करावे लागतील.

निकिताने व्हर्चुअल मीटिंगमध्ये सामिल होण्याचे गोष्ट कबूल केली
टूलकिट प्रकरणी मुंबईस्थित वकील आणि कार्यकर्त्या निकिता जेकब यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. त्यानंतर निकिताने 26 जानेवारीपूर्वी झालेल्या व्हर्चुअल मीटिंगमध्ये उपस्थित राहण्याची कबुली दिली. ज्यात झूम अॅपद्वारे पोएटीक जस्टिस फाउंडेशन (पीजेएफ) चे संस्थापक एमओ धालीवाल, दिशा आणि इतर लोक सामिल झालेले होते. 11 जानेवारी रोजी ही बैठक झाली होती. यात 70 लोक उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनी झूम अॅप वरून सर्व माहिती मागितली आहे. पोलिसांनी सांगितले की ही बैठक PJF ने बोलवली होती, ज्यांचे संस्थापक एमओ धालीवाल आहेत. यामध्ये ग्लोबल फार्मर स्ट्राइक आणि ग्लोबल डे ऑफ अॅक्शन 26 जानेवारी नावाने टूलकिट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टूलकिटवर निकिता काय म्हणते…

1. टूलकिटचा हेतू आंदोलनाची प्रतिमा सादर करणे होता

निकिताच्या वकिलाने मुंबई पोलिसांसमोर या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामध्ये निकिता म्हणाली, ‘टूलकिट एक्सट्रॅक्शन रेबिलियन NGO (XR) च्या भारतीय स्वयंसेवकांनी तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतकरी चळवळीचे संपूर्ण चित्र सादर करणे हा यामागील हेतू होता.

2. आमचा हेतू हिंसा भडकावणे नव्हता
तिने म्हटले, ‘मी स्वीडनच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. हे टूलकिट डॉक्यूमेंट इन्फॉर्मेशनल पॅक होते आणि हिंसा भडकवण्याच्या उद्देशाने नव्हते. त्यामागे माझा कोणताही राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक अजेंडा नव्हता.

ग्रेटा थेनबर्गने टूलकिट शेअर केल्यावर प्रकरण वाढले
हे प्रकरण देशातील शेतकऱ्यांशी संबंधित आहे, जे 83 दिवसांपासून दिल्लीच्या दारात आंदोलन करत आहेत. 3 फेब्रुवारी रोजी 18-वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग हिने दोन सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या. पहिल्या पोस्टमध्ये तिने शेतकऱ्यांचे समर्थन केले होते, दुसर्‍या पोस्टमध्ये तिने एक टूलकिट शेअर केली. ही टूलकिट प्रत्यक्षात एक डॉक्यूमेंट होती. यामध्ये ‘अर्जेंट, प्रायर आणि ऑन ग्राउंड अॅक्शंस’ चा उल्लेख होता.

कायदा 20 वर्षे आणि 50 वर्षांमध्ये फरक करत नाही – दिशा अटकेबाबत दिल्ली पोलिस
या प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी 14 फेब्रुवारी रोजी कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक केली. 22 वर्षांची दिशा ही BBA ची विद्यार्थीनी आहे. 2019 मध्ये क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट ग्रुप फ्रायडे फॉर फ्चूयरची इंडिया विंग सुरू केली होती. ग्रेटा थनबर्ग या आंतरराष्ट्रीय समूहाची संस्थापक आहे. या अटकेला विरोधीपक्ष व अॅक्टिव्हिस्ट कम्युनिटीने आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी नेत्यांनीही दिशाला बिनशर्त सोडण्याची मागणी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दिशाच्या अटकेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले की, अटक प्रक्रिया प्रक्रियेनुसार केली गेली. कायद्यात 22 वर्षे किंवा 50 वर्षांमध्ये फरक नाही. दिशाला कोर्टात हजर केले असता तिथून तिला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. लोक म्हणतात की, अटकेमध्ये त्रुटी आहेत, तर असे म्हणणे चुकीचे आहे.


Back to top button
Don`t copy text!