दिनानाथ, पवना, गिन्नी, मारवेल आणि सिग्नल… जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि.३०: दिनानाथ, गिन्नी, पवना, डोंगरी, मारवेल, सिग्नल आणि  काळी धामण ही नावे आहेत. विविध प्रकारच्या गवताची वन विभागातर्फे जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे सातशे एकरावर या गवतांची लागवड केली जाणार आहे.

सोलापूर जिल्हा माळरानासाठी प्रसिध्द आहे. ही ओळख अधिक दृढ व्हावी, माळरानाची परिस्थिती विकसित व्हावी यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ही संकल्पना असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माळरान आहे. या माळरानावर गवतांची लागवड केली जाणार आहे. यामुळे या परिसरातील पक्षी वैभव वाढीस लागणार आहे. या गवतामुळे जमिनीची धूप थांबते त्याचबरोबर भूजल पातळीत वाढ होते. या गवत लागवडीमुळे गवत चारा उपलब्ध होऊ शकेल, पर्यायी पशुपालकांचे स्थलांतर थांबेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील वन विभागाच्या मुरमाड, रेताड, डोंगरमाथा, गायरानावर गवत लावले जाणार आहे. यासाठी वन विभागाच्या चार नर्सरीमधून गवताची रोपे तयार करण्यात आली आहेत. वरील प्रजातींचे गवत लावल्यास त्यापासून तीन वर्षे लाभ होऊ शकतो, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

वनविभागाची कॅम्पा योजना आणि जिल्हा नियोजन समितीच्या गवत लागवड योजनेतून गवत रोपे लावली जाणार आहेत.

  • जिल्ह्यातील पंढरपूर माळशिरस, सांगोला तालुक्यात करणार लागवड.
  • एकूण सातशे एकरवर गवत लागवड.
  • तीन वर्षे लाभ होणार.
  • जमिनीची धूप रोखणे, भूजल पातळी वाढण्यास मदत.

Back to top button
Don`t copy text!