
स्थैर्य, कोल्हापूर, दि. 28 : कोल्हापूर शहरातील ख्यातनाम उद्योजक दिलीपराव केशवराव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. आज (दि. २८) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेती अवजारे उत्पादनातील अग्रगण्य कंपनी पॉप्युलर स्टील वर्क्सचे ते मालक होते.
दिलीपराव जाधव यांनी पॉप्युलर स्टील वर्क्सच्या माध्यमातून शेतीक्षेत्रात विविध अवजारांची निर्मिती केली. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगजगतात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना कोल्हापूर वासियांकडून व्यक्त होत आहे.