दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून धुमाळवाडी (ता. फलटण) हे गाव ‘फळांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसे प्रशस्तीपत्र शासनाच्या कृषी विभागाकडून गावास नुकतेच प्रदान करण्यात आले.
धुमाळवाडी गावात शेतकर्यांनी १९ विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केलेली आहे. गावामध्ये फळांचे उत्पादन, फळ प्रक्रिया उद्योग, फळांची निर्यात आणि पर्यटन विकासाच्या द़ृष्टीने भरीव कार्य होत आहे. या कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्रात विशेषत: फळबाग लागवडीमध्ये या गावाची ओळख निर्माण होत आहे.
गावातील तरुण शेतकर्यांना फळबाग लागवड आणि फळ प्रक्रिया उद्योगामध्ये काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शासनाकडून धुमाळवाडी गाव हे ‘फळांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.