
दैनिक स्थैर्य | दि. 19 जुलै 2025 । विडणी । श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीआहे . रयत प्रज्ञाशोध परीक्षा, इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस. व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.
इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. प्रणिती प्रकाश क्षीरसागर हिने जिल्हा गुणवत्ता यादी यश संपादन केले आहे. रयत प्रज्ञाशोध परीक्षेत कु शिंवाजली कर्णे , राधिका भिवरकर यांनी यश मिळवेत.
इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. अन्विता रवींद्र परमाळे (राज्यात अकरावी), कु. सानिका दत्तात्रय शेळके आणि खिलारे प्रणव राजेंद्र यांनी यश मिळवले. तसेच खिलारे प्रणव याची एन.एम.एम.एस. आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी निवड होऊन विद्यालयाचा सन्मान वाढविला आहे.
या विद्यार्थ्यांना श्री. अभंग एस.बी., श्री यादव सर ,सौ. कोकरे मॅडम, श्रीम. लव्हाटे मॅडम, सौ. परमाळे मॅडम, सौ गाडे मॅडम , श्री गायकवाड सर श्री. जगताप सर आणि श्रीम. पेटकर मॅडम या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
जनरल बॉडी सदस्या सौ. प्रतिभा शिंदे, विभागीय अधिकारी श्री. नवनाथ जगदाळे, मुख्याध्यापक श्री. मोरे ए. व्ही., स्कूल कमिटी सदस्य श्री. चंद्रकांत जाधव व श्री. हरिभाऊ माने, धुळदेव व पंचक्रोशीतील पालक व शिक्षकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्याथ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.