धोम – बलकवडीचे पाणी फलटण व खंडाळा तालुक्याला सोडणार : आमदार दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ०१ मार्च २०२४ | फलटण | सध्या सुरू असलेल्या टंचाई परिस्थितीमध्ये फलटण व खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाण्याची कमतरता भासू नये म्हणून धोम बलकवडी धरणामधून फलटण व खंडाळा तालुक्यासाठी पिण्याचे पाणी सोडण्यात यावे; अशी आग्रही मागणी फलटणचे आमदार दीपक चव्हाण व खंडाळाचे आमदार मकरंद पाटील यांनी केली होती. त्यावर पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी धोम – बलकवडी धरणामधून फलटण व खंडाळा तालुक्यासाठी पिण्याचे पाणी सोडण्यात यावे; असे निर्देश दिले असल्याची माहिती आमदार दीपक चव्हाण यांनी दिली आहे.

मुंबई येथील विधान भवनामध्ये धोम – बलकवडी कालवा समितीची बैठक पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेली होती. यावेळी आमदार दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की; सध्या फलटण व खंडाळा तालुका मध्ये बऱ्याच गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा आठवड्यातून काही वेळा मिळत आहे. या सर्वावर उपाय योजना म्हणून धोम – बलकवडी धरणा मधून पिण्याचे पाणी सोडणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्याकडे आमदार दीपक चव्हाण व आमदार मकरंद पाटील यांनी आग्रही भूमिका मांडत धोम बलकवडी धरणांमधून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी धोम बलकवडी धरणांमधून खंडाळा व फलटण तालुक्यासाठी पिण्याचे पाणी सोडण्याबाबतचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!