
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 15 : सातारा येथील नगरपालिकेच्या बांधकाम विभागात अभियंत्यांच्या समोरच दुपारी 12 वाजता ढिशुंम ढिशुंम झाली. या घटनेची शहरात लगेच वार्ता पसरली. पालिकेच्या एका ठेकेदाराची आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांच्यात ही फायटिंग झाली.
नरेंद्र पाटील यांनी आपली कैफियत सी ई ओ शंकर गोरे यांच्याकडे मांडली. याची नोंद पोलिसात झाली नव्हती. मात्र, अगोदरच पालिका भ्रष्टाचार प्रकरणाने गाजत असताना पुन्हा नव्याने फायटिंगचा प्रकार घडला आहे.
सातारा नगरपालिकेत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना ठेकेदाराकडून मारहाण पहा स्विस्तर वृत्तांत
