स्थैर्य, मायणी, दि. 28 : तारळी योजनेचे पाणी मायणी येथील पडळकर तलावात व माळीनगर तलाव व खडकाचा मळा तलाव येथे पोहोचले असून या प्रश्नी सातत्याने लढा देत पाठपुरावा करून पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवारातील शेतकर्यांनी डॉ. दिलीप येळगावकर यांचा सन्मान केला. या पाण्याचे पूजन डॉ. दिलीप येळगावकर, डॉ. सौ.उर्मिला येळगावकर, युवानेते सचिन गुदगे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, उपसरपंच आनंदराव शेवाळे, महादेव ढवळे, नितीन पडळकर, अभिजित काबुगडे, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्व.भाऊसाहेब गुदगे यांचे स्वप्न डॉ. येळगावकरांच्या प्रयत्नातून साकार झाल्याबद्दल युवानेते व मायणीचे सरपंच सचिनभाऊ गुदगे यांनी आनंद व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, आ. चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीश महाजन, सुभाष देशमुख यांच्याशी पाणी योजनांसंबंधी चर्चा झाली होती. धोंडेवाडी उड्डाणपुलाचे काम बंद होते. पुन्हा पाठपुरावा केला.त्यामध्ये रणजित देशमुखांचाही वाटा आहे. तारळीसाठी प्रयत्न केला. अनफळे व माळीनगर या ठिकाणी पाणी नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गुंडेवाडी, यलमरवस्ती, चितळी येथे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाऊसाहेबांना हे पाणी आणायचे होते. उरमोडीतून तारळीत पाणी येत आहे. टेंभूचे पाणी लवकरच मायणीच्या धरणात येईल. मायणीतील पंढरपूर- मल्हारपेठ महामार्गाचेही काम 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. यशवंतबाबा मंदिराजवळचा रस्ता रुंदीकरणातील अडचणी दूर करू. पूर्ण इमारत ढासळू नये म्हणून काहीना सवलत दिली. अभेद्य संघटनेच्या जोरावर विकासकामे गतीने पूर्ण होत आहेत असे डॉ. येळगावकर म्हणाले. मोहन दगडे यांनी आभार मानले. राजू कचरे यांनी सूत्रसंचालन केले.