साताऱ्याची अर्थवाहिनी धन्वंतरी पतसंस्था

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


  

स्थैर्य, सातारा, दि. 16 : आज 16 ऑक्टोबर धन्वंतरी पतसंस्थेच्या स्थापना दिन . गेल्याच आठवड्यात सहकार भारतीच्या बैठकीत सहकार भूषण या पुरस्कारा बाबत चर्चा झाली होती त्यावेळी माझे मन  30 वर्षे मागे गेले. 

धन्वंतरी पतसंस्थेच्या जन्म कसा झाला त्या घटना मला आठवू लागल्या.मला मोटार सायकल घेताना,रवीला हॉस्पिटल काढायला ,कांत व शकीलला  व शिरीषला दवाखाना काढायला लागलेले कर्ज मिळवताना झालेल्या त्रासाची चर्चा मोती चौकातील कट्यावर रोज व्हायची. वैद्यकीय व्यावसायिकांच्या  समस्यांचा विचार करताना   रवि भोसलेंच्या मनात आले की आपणच वैदयकीय व्यावसायिकां साठी पतसंस्था काढली तर ? यासाठी मार्गदर्शक कोण असा विचार करताना सर्वांच्या नजरेसमोर एकच नाव आले, डॉ.लाहोटी सर!मग आमच्या बैठका सुरू झाल्या.

रवीच्या प्रचंड ओळखींचा व सर्व स्तरात असणाऱ्या मित्रांचा पतसंस्थेसाठी शेअर्स गोळा करायला  खूप फायदा झाला. त्या वेळी शेअर्स गोळा करतांना झालेला त्रास ,होणाऱ्या टीका यांची चर्चा रोज चालायची. एके दिवशी रवीचा फोन आला बाळू आपल्याला पतसंस्था स्थापनेस परवानगी मिळाली तो दिवस म्हणजे “16 ऑक्टोबर 1989” रवीच्या घरी 10×10 च्या खोलीत ऑफिस सुरु झाले .रवीच्या घरातील जुने टेबल , माझ्या घरातील जुना टाईपरायटर अशातून ऑफिस सुरू झाले.संजय पवार सारखा कर्तबगार व्यवस्थापक मिळाला .संचालक मंडळाच्या बैठका रवीच्या घरीच व्हायच्या. सौ.मंगला वहिनी आनंदाने चहा नाष्टा द्यायच्या. आता होणाऱ्या मिटींगमधल्या कोणत्याही डिश पेक्षा त्यावेळचा पोहे चहा जास्त छान वाटतात.

धन्वंतरी मुळे अनेक मित्रांच्या अडचणीमध्ये मदत करू शकलो .सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना हक्काने कर्ज देणारी धन्वंतरी पतसंस्था मिळाली .धन्वंतरी पतसंस्थेस महाराष्ट्र शासनाचा “सहकार भूषण ” हा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला.संस्थेच्या प्रगतीत डॉ.सुनील कोडगुले, डॉ.हेमंत शिंदे,डॉ.राजेंद्र जाधव,डॉ.कैलास खडतरे, डॉ.सरगर, डॉ.सौ.मस्कर, श्री.सूर्यकांत देशमुख,डॉ.अभिजित भोसले या संचालकांनी मोलाची मदत केली.जुन्या संचालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या पतसंस्थेच्या या यशात आमचे सर्व शाखाप्रमुख, सभासदांना उत्तम सेवा देणारा आमचा कर्मचारी वर्ग, आमचा वसुली विभाग यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच संस्थेची ही वाटचाल सुरळीतपणे चालू आहे.

पतसंस्थेच्या नवीन इमारती समोर उभे असताना मला खात्री वाटते की संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात धन्वंतरी पतसंस्था भारतातील सर्वात मोठी होईल . हे सर्व करताना आपल्या सर्व सन्मानीय सभासदांच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे.

जय सहकार 

डॉ.अरविंद काळे,संचालक


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!