दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | बारामती |
जैनकवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनश्री संतोष लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी अशपाक इनामदार व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक अतुल गरगडे यांनी काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच संदीप शेंडे, उपसरपंच बाळू सोमानी, सदस्य स्वाती काळे, सतीश लोखंडे, सोमेश पवार, अनिता धापटे, ज्योती शेटे, प्रकाश सूर्यवंशी, बाळासाहेब माने, दत्तात्रेय मिंड, राजेंद्र मेंढे, संतोष लोखंडे, शिवाजी लोखंडे, संतोष ननवरे, कुंडलिक माने, दत्तात्रेय लोखंडे, सुनील पवार, भगवान लोखंडे, अवधूत लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.