
स्थैर्य, मुंबई, दि.४: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी लैंगिक शोषणाची तक्रार केलेल्या रेणू शर्मा यांची बहिण आणि धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचे मान्य केले होते त्या करुणा शर्मा यांनीच आता मुंडेंविरोधात तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ‘चित्रकूट’ बंगल्यात 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, करुणा यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.