धैर्यशील मोहिते – पाटील लोकसभा लढवणार : जयसिंह (बाळदादा) मोहिते – पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ मार्च २०२४ | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते – पाटील हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती माळशिरस तालुक्याचे जेष्ठ नेते जयसिंह (बाळदादा) मोहिते – पाटील यांनी दिली आहे.

आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माढा, बारामती व कोल्हापूर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येवू शकत नाही. यासोबतच माण, करमाळा, माळशिरस व सांगोला या ठिकाणी विधानसभेला सुद्धा नक्कीच फटका बसणार आहे; असे मत जयसिंह (बाळदादा) मोहिते – पाटील यांनी व्यक्त केले.

अकलूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयसिंह (बाळदादा) मोहिते – पाटील बोलत होते. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!