राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेतून फलटण नगर परिषदेस २० कोटींचा विकास निधी मंजूर

आ. दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांची माहिती


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेस राज्य शासनाच्या ‘नगर परिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांना विशेष अनुदान’ या योजनेंतर्गत विविध विकासकामांसाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘लक्ष्मी – विलास पॅलेस’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा निधी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाचे आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सदरील निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

फलटण नगर परिषदेस मंजूर झालेली २० कोटींची विविध विकासकामे खालीलप्रमाणे :

  1. गोळीबार मैदान येथे पाण्याची उंच टाकी बांधणे व अनुषंगिक कामे करणे – ८० लक्ष
  2. बारवबाग येथे पाण्याची उंच टाकी बांधणे व अनुषंगिक कामे करणे – ८० लक्ष
  3. सुधारित जलकेंद्र ते गिरवी नाका मेन राईजिंग मेल बसविणे व ५० एचपी मोटर खरेदी करून बसविणे – २०० लक्ष
  4. श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते महात्मा फुले चौक रस्ता विकसित करणे व डेकोरेटीव्ह पोल उभारणे – ६३ लक्ष
  5. मुस्लीम दफन भूमी करीता संरक्षक भिंत बांधणे – ३० लक्ष
  6. फलटण-सातारा रस्ता बाणगंगा नदीलगत स्वागत वेस उभारणे – ३५ लक्ष
  7. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर विकसित करणे – ६० लक्ष
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर विकसित करणे – ६० लक्ष
  9. शहरामध्ये विविध ठिकाणी स्ट्रॉम वॉटर्स ड्रेन बांधणे – १०० लक्ष
  10. बाणगंगा नदी वाहवा विधी पूल विकसित करणे – १३० लक्ष
  11. प्रभाग क्र. ६ ब्राह्मणगल्ली येथील डीपी शिफ्ट करणे – १७ लक्ष
  12. महात्मा गांधी चौक ते बादशाही मस्जिद रस्ता विकसित करणे – १०० लक्ष
  13. वेलणदर दत्त मंदिर ते नेहरू चौक ते कॉलेज रोड दत्त मंदिर रस्ता करणे – ४५ लक्ष
  14. कृषीराज कॉलनी येथे सिमेंट काँक्रिट रस्ता करणे – २० लक्ष
  15. शंकरराव घाडगे दुकान ते नेवसे घरापर्यंत रस्ता काँक्रिट करणे – २० लक्ष
  16. साळुंखे जुनी विहीर ते हाडके घर रस्ता काँक्रिट करणे – २० लक्ष
  17. अरुण गायकवाड घर ते दीक्षित घर रस्ता काँक्रिट करणे – २० लक्ष
  18. साईबाबा मंदिर स्वागत कमान रोड ते बर्गे गॅरेज रस्ता करणे – २५ लक्ष
  19. उदय मांढरे घर ते प्रवीण घनवट घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे – १५ लक्ष
  20. सगुणामाता नगर अजित पवार घर ते मोहिते घर रस्ता करणे – २५ लक्ष
  21. सुरेश पवार घर ते किशोर गायकवाड घर रस्ता डांबरीकरण करणे – २५ लक्ष
  22. प्रभाग क्र. १२ मुक्ती आंगण अपार्टमेंट ते एल.बी. कदम घर रस्ता करणे व संरक्षिक भिंत बांधणे – २० लक्ष
  23. प्रभाग क्रमांक १२ लक्ष्मीनगर नवीन सुविधा हॉस्पिटल येथे रस्ता करणे – १० लक्ष
  24. प्रभाग क्रमांक १२ भोरी मस्जिद ते मुक्ती आंगण अपार्टमेंट ते एल.बी. कदम घरापर्यंत ४ इंची पाण्याची वितरण नलिका बसविणे – २५ लक्ष
  25. प्रभाग क्र. १२ सहारा साडी ते निंबाळकर घरापर्यंत पाण्याची वितरण नलिका बसविणे – १५ लक्ष
  26. हाडको वसाहत इरफान शेख घर ते मिलिंद भोसले घर घर लादीकरण करणे, हाडको वसाहत प्रशांत कांबळे घर ते पंकज शिंदे घर घर लादीकरण करणे, हाडको वसाहत प्रकाश पवार घर ते सचिन सावंत घर घर लादीकरणे करणे, हाडको वसाहत कलाल शेख घर ते चोलमले घर घर लादीकरण करणे, हाडको वसाहत आवटे घर ते सस्ते घर घर लादीकरण करणे – ३० लक्ष
  27. महाराजा मंगल कार्यालय परिसर कदम घर ते फिरोज बागवान प्लॉट पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – १५ लक्ष
  28. कर्णे घर ते खडकहीरा ओढ्यापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – १५ लक्ष
  29. संजीवराजे नगर सर्व्हे नं. ४०/६ सभामंडप बांधणे – १० लक्ष
  30. प्रभाग क्र. १० दिलीप पवार घर ते नाथ मंदिर पिण्याच्या पाण्याच्या वितरण नलिका बसविणे – १५ लक्ष
  31. प्रभाग क्र. १० हनुमान नगर काळोखे वस्ती पिण्याच्या पाण्याच्या वितरण नलिका बसविणे, प्रभाग क्र. १० किरण काटकर घरापासून ते मोठ्या गटारीपर्यंत गटर करीता सिमेंट पाईप बसविणे व चेंबर बांधणे व काँक्रिट करणे – १९ लाख
  32. प्रभाग क्र. १० निलेश चिंचकर घर, हेमंत चिंचकर घर, राजू पवार, गोसावी घर परिसरामध्ये सिमेंट काँक्रिट करणे, प्रभाग क्र. १० उपाध्याय बोळ परिसरामध्ये सिमेंट काँक्रिट करणे, प्रभाग क्र. १० अहिंसा मैदानलगतचा रस्ता सिमेंट काँक्रिट करणे – ११ लक्ष
  33. प्रभाग क्र. १० सार्वजनिक परिसरामध्ये सिमेंट काँक्रिट करणे, प्रभाग क्र. १० मंगलताई मठासमोरील परिसर सिमेंट काँक्रिट करणे, प्रभाग क्र. १० डॉ. गुंगा ते बाजारे घरासमोरील परिसर सिमेंट काँक्रिट करणे, प्रभाग क्र. १० सम्राट जनरल स्टोअर शेजारील परिसरामध्ये सिमेंट काँक्रिट करणे, प्रभाग क्र. १० बाळु सुतार पानपट्टी ते मंदिरापर्यंत गटर करीता सिमेंट पाईप बसविणे व चेंबर बांधणे – १५ लक्ष
  34. प्रभाग क्र. १० दिलीप पवार घर ते नाथ मंदिर रस्ता परिसरामध्ये सिमेंट काँक्रिट करणे, प्रभाग क्रमांक १० संतबापूदास नगर कमान करणे – १५ लक्ष
  35. प्रभाग क्र. १० हनुमान नगर येथील कमानीनजीक संरक्षक भिंत बांधणे – १० लक्ष
  36. प्रभाग क्र. १० बुधवार पेठ हनुमान मंदिरालगतची वापरात नसलेला पाण्याचा हौद पाडून संरक्षक भिंत बांधणे, प्रभाग क्र. ८ शिवाजीनगर अंतर्गत सार्वजनिक वापरांच्या बोळांमध्ये लादीकरण करणे – ३१ लक्ष
  37. प्रभाग क्र. ८ विटकर आळी सिमेंट काँक्रिटीकरणे करणे – १५ लक्ष
  38. प्रभाग क्र. ८ विटकर आळी गटर करीता सिमेंट पाईप बसविणे व चेंबर बांधणे, प्रभाग क्र. ८ कदम घर ते कोठाडिया घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे – १६ लक्ष
  39. प्रभाग क्र. ८ कर्णे घर ते खडकहीरा ओढा घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ८ शिवाजीनगर ढवरे आळी सामाजिक सभागृह बांधणे – १३ लक्ष
  40. पद्मावती नगर स्वरा कॉर्नर ते शशिकांत थोरात घरापर्यंत ३ इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची वितरण नलिका बसविणे – ३० लक्ष
  41. पद्मावती अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे – ११५ लक्ष
  42. प्रभाग क्र. ६ शनीनगर बाणगंगा नदी संरक्षक भिंत बांधणे – १५० लक्ष
  43. प्रभाग क्र. ६ नसरूद्दीन शेख घराजवळ रिटेनिंग वॉल बांधणे – २० लक्ष
  44. प्रभाग क्र. ७ उमाजी नाईक चौक, कोडवाडा परिसर, मेटकरी गल्ली परिसर, पवार गल्ली परिसर व इतर सार्वजनिक वापरांच्या बोळांमध्ये पेव्हींग लादीकरण करणे तसेच गटर करीता सिमेंट पाईप बसविणे व चेंबर बांधणे – २५ लक्ष
  45. प्रभाग क्र. ७ हेंद्रे वकील ते पवार घर लादीकरण करणे, प्रभाग क्र. ९ अविनाश चोरमले घर ते समशेर शेख घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे – १८ लक्ष
  46. प्रभाग क्र. ९ कोळपे घर ते रामदास निकम घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्र. ९ कोळपे घर ते नेताजी चोरमले घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्र. ९ बेडके घर ते रामभाऊ जगताप घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे – १५ लक्ष
  47. उमाजी नाईक तालीम वरचा मजला बांधणे व जिम साहित्य पुरविणे – १५ लक्ष
  48. प्रभाग क्र. ९ अहिवळे घर ते फडतरे घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्र. ९ शिवाजी रोड येथील अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण करणे – २० लक्ष
  49. प्रभाग क्र. ९ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिराच्या परिसरामध्ये लादीकरण करणे, प्रभाग क्र. ९ अतुल कोठाडिया ते मदने घर अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्र. ९ पवार घर ते मलाणी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे – १३ लक्ष
  50. प्रभाग क्र. ९ शामराव निकम ते भोसले घरापर्यंत गटर करीता सिमेंट पाईप बसविणे व चेंबर बांधणे, प्रभाग क्र. ९ बर्गे घर ते जाधव घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ९ शामराव निकम ते रूपनवर सर घरापर्यंत गटर करीता सिमेंट पाईप बसविणे व चेंबर बांधणे – १० लक्ष
  51. प्रभाग क्र. ९ रवींद्र बेडकिहाळ घर ते कांबळे घरापर्यंत बोळ सिमेंट काँक्रिटीकरण करणे, कामगार वसाहत मेहतर कॉलनीमधील समाज मंदिरावर मजला बांधणे, वाचनालय करणे – १९ लक्ष
  52. प्रभाग क्र. ८ मध्ये रिंगरोड झोपडपट्टी काँक्रिटीकरण करणे व ड्रेन व्यवस्था करणे – १५ लक्ष
  53. प्रभाग क्र. ८ घडशी गल्ली येथील बोळे काँक्रिटीकरण करणे – १५ लक्ष
  54. प्रभाग क्र. ३ येथील पेठ मंगळवार न.क्र. भू. ८७६ येथे वडार समाजासाठी २ मजली समाज मंदिर इमारत बांधणे. – ५० लक्ष

अशा एकूण २० कोटी रूपयांच्या फलटण नगर परिषद हद्दीतील विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याचे आ. दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!