
दैनिक स्थैर्य । 12 एप्रिल 2025 । फलटण । किल्ले राजगड पायथ्याशी पाल खु ता. राजगड परिसरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आईसाहेब श्रीमंत महाराणी छत्रपती सईबाई यांच्या समाधीस्थळास भेट देऊन दर्शन घेतले. तसेच समाधीस्थळाच्या विकास कामाची पाहणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली.
यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या कि, या समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने १६.५० कोटीचा निधी मंजूर केला होता, व सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर येथे सुरु असलेल्या शिवपट्टणम वाड्याच्या कामाची पाहणी केली. यासाठी देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात २९.७३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हेही काम सध्या प्रगतीपथावर आहे.
यावेळी आराखड्यानुसार समाधी स्थळाचे काम आणि वाड्याचा विकास सर्वोत्तम करण्यात यावा, अशी सुचना संबंधित अधिकाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या आहेत.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.