स्थैर्य, फलटण, दि. ०४ : पुणे व सातारा आकाशवाणीवर सांधे, मणके किंवा हाडांच्या सर्व आजारांवर दिनांक ६ जानेवारी २०२० पासून सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्या सोबतच सांधे, मणके किंवा हाडांच्या विविध विषयांवर नियमित चर्चा केली जाणार आहे. हाडे ठिसूळ होणे म्हणजे काय ? हाडे ठिसूळ होणे कसे टाळावे या बाबत सविस्तर माहिती दिनांक ६ जानेवारी २०२० पासून दर बुधवारी सविस्तर रित्या दिली जाणार आहे. तरी श्रोत्यांनी दिनांक ६ जानेवारी २०२० पासून दर बुधवारी पुणे विविधभारती म्हणजेच १०१ मेगाहार्ट्स या रेडिओ चॅनेलवर सकाळी १०.३० वाजता आणि दर गुरुवारी सातारा विविधभारती म्हणजेच १०३ मेगाहार्ट्स वर याचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी केलेले आहे.