भाडळी खुर्द येथे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम सुरु वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । फलटण । भाडळी खुर्द ता. फलटण येथे गावठाण मागासवर्गीय वस्ती येथे खडीकरण डांबरीकरण करणे हे काम सुरू असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत गटविकास अधिकारी व उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण यांच्याकडे लेखी तक्रार करूनही भाडळी खुर्द येथील ग्रामस्थांनी केलेल्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही. कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ८.८० लक्ष इतकी असूनही रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित मानकाप्रमाणे होत नसल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. हा रस्ता नकाशामध्ये १६ फुट असताना काही ठिकाणी 10 फूट, काही ठिकाणी 12 फूट, तर काही ठिकाणी 13 फूट असा रस्ता बनवण्यात येत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारे काढण्यात आलेली नाहीत.

आवश्यक त्या ठिकाणी पावसाच्या साचलेल्या किंवा खोलगट भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी सिमेंटच्या पाईप टाकण्याची आवश्यकता असताना काही ठराविक ठिकाणीच सिमेंटच्या पाईप टाकण्यात आल्या आहेत त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सांडपाणी व इतर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या सर्व बाबींचा विचार करणे अपेक्षित असताना निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतमध्ये वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. संबंधितांवर करवाई करून रस्ता मंजूर निकषाप्रमाणे करावा अन्यथा वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!