दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा नगरपरिषद या मातृसंस्थेला मिळालेला पुरस्कार बघवत नसल्यानेचे, नगरविकास आघाडीने, निकष मॅनेज करुन, फोटो पाठवून पुरस्कार मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या वक्त्व्यातुन समस्त सातारकर नागरीक आणि नगरपरिषदेच्या कर्मचार्यांचा देखील अवमान झाला आहे. त्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी करत, सातारचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जरा अभयास करावा आणि मग आपल्या अकलेचे तारे तोडावेत असा घणाघात लगावला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी नमुद केले आहे की, शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातारा नगरपरिषदेचा राज्यात 4 था क्रमांक मिळाला. सदरचा सन्मान, संपूर्ण सातारकर नागरीकांनी दिलेल्या सहयोगामुळे आणि केंद्राचे निकषाप्रमाणे वरिष्ठ स्तरावरील मुल्यांकनाव्दारे, मेरिटवर प्राप्त झाला आहे. या पुरस्काराच्या पाठीमागे कर्मचार्यांचेही अमुल्य योगदान राहीले आहेच परंतु सातारकरांनी देखिल आपली बहुमुल्य सामाजिक जबाबदारी पार पाडल्याने, शहर स्वच्छ राहण्यास चांगली मदत झाली आहे. त्यामुळे आणि मातृसंस्थेला मिळालेला पुरस्कार सर्व सातारकरांचा आहे.
तसेच पुरस्कार नगरपरिषदेचा म्हणजेच सर्व नगरसेवकांचा म्हणजे आजी-माजी सर्व नगरसेवक-पदाधिकारी यांचा देखिल आहे. परंतु साविआच्या नेतृत्वाखाली पुरस्कार मिळाल्याने, समस्त साताकरांचा असलेला हा पुरस्कार नगरविकास आघाडीला बघवत नसावा म्हणूनच त्यांनी पुरस्कार मॅनेज करुन मिळवल्याचा गंभिर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपामुळे समस्त सातारकर नागरीकांचा आणि सातारा नगरपरिषदेच्या सर्वच कम्रचार्यांचा अवमान झाला आहे.
तसेच नगरपरिषदेच्या सभा योग्य वेळी बोलावण्यात आलेल्या आहेत. नागरीकांचे प्रश्न वेळीच सोडवणे, वेळीच अंमलबजावणी करणे इत्यादी सुचना आमचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साविआला दिल्या आहेत. साविआ असे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध होती व आहे. त्यानुसार वेळोवेळी नागरीकांचे प्रश्न सोडवण्याचे काम साविआने ज्या-त्या वेळी केले आहे. नुकत्याच स्थायीच्या बैठकीत नागरीकांचे सर्वात जास्त विषयांचा समावेश करण्यात आला होता. नागरीकांचे प्रश्न प्रलंबीत आहेत अशी परिस्थिती नाही. साविआच्या कामाच्या वेगवान गतीमुळे एकंदरीत नविआला काही विधायक कामच नसल्याने, रिकामटेकडेपणा आला आहे. म्हणुनच त्यांना साविआ बाबत पोटशुळ उठलेला दिसतो. अमोल मोहिते यांनी आता अधिक टिवल्या-बावल्या, रिकामटेकडेपणा करण्यापेक्षा आपल्या वॉर्डातील कामांबाबत अधिक लक्ष द्यावे असा मिश्किल टोला देखिल मनोज शेंडे यांनी लगावला आहे.