दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2025 | फलटण | शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फलटण तालुक्याच्या शिवसेना दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. हा सोहळा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नानासाहेब उर्फ पिंटू ईवरे यांनी आयोजित केला होता.
दिनदर्शिकेत शासकीय योजना व विविध दाखल्यांची उपयुक्त माहिती दिली गेली आहे. जातीचा दाखला, शेतकरी दाखला, नॉन क्रीमिलियर, डोमासाईल, एससी/एसटी दाखला, उत्पनाचा दाखला यासारख्या महत्त्वाच्या दाखल्यांची माहिती यात समाविष्ट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधी, इंदिरा गांधी अपंग योजना, संजय गांधी योजना अशा विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली गेली आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनदर्शिकेत दिलेल्या माहितीबद्दल विशेष कौतुक केले. त्यांनी सामान्य नागरिकांना शासकीय योजना व दाखले कसे मिळवावेत याची माहिती देण्यासाठी तालुका प्रमुख नानासो इवरे यांचे विशेष अभिनंदन केले.
या दिनदर्शिकेमुळे सामान्य नागरिकांना शासकीय योजना व दाखल्यांबद्दलची माहिती सोप्या भाषेत मिळेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ही दिनदर्शिका फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा साधन असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.