
दैनिक स्थैर्य । 14 जून 2025 । सातारा । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आले असून सातारा येथील बॉम्बे रेस्टारंट चौक येथे राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे खुर्द येथे मुक्कामी असणार आहेत.