सातारा नगरपालिका इमारतीत उपमुख्यधिकारी यांनाच लाच घेताना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.८ : सातारा नगरपालिका ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. छत्रपतींची राजधानी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या सातारा नगर पालिकेत तब्बल २ लाख ३० हजारांची लाच घेताना उपमुख्यधिकारी संचित धुमाळ यांनाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

तक्रारदार यांनी सातारा नगर परिषद सातारा येथील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी. डिपॉझिट पंधरा लाख रुपये परत मिळून देण्यासाठी आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे २३००००/-  रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती लाच तक्रारदार यांचेकडून स्विकारताना मिळून आला .यामध्यें संचित कृष्णा धुमाळ वय ३३ वर्षे  श्रेणी अ उपमुख्याधिकारी सातारा नगर परिषद रा. केसरकर पेठ सातारा मूळ राहणार रायकर नगर धायरी पुणे, गणेश दत्तात्रय टोपे वय ४३वर्ष आरोग्य निरीक्षक वर्ग ३ रा.३२२ यादोगोपाळ पेठ सातारा, प्रवीण एकनाथ यादव वय ५१ वर्ष आरोग्य निरीक्षक वर्ग ३ रा.धाधमे कॉलनी करंजे पेठ सातारा, राजेंद्र कायंगुडे  आरोग्य निरीक्षक वर्ग ३ रा.१७२/२एसटी कॉलनीचे पाठीमागे गोडोली सातारा यांचे वर गुन्हा दाखल केला आहे. 

आज दुपारी गोपनीयता पाळून सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक उपआयुक्त अशोक शिर्के व पो नि जगताप त्यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईने सातारा नगर पालिकेची आणखी एक वेगळी बाजू चव्हाट्यावर आली आहे.  शंभर वर्षांची परंपरा असलेल्या सातारा नगर पालिकेच्या कारकिर्दीत अनेक प्रामाणिक नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी तसेच अधिकारी म्हणून अनेकांनी काम केले होते. पण, एवढया मोठ्या प्रमाणात लाच घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने ‘तो मी नव्हेच” असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे.

सातारा नगरपालिका म्हणजे एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी निधी वाटप करणे, कधी मोजक्या लोकांना रोख रक्कम व पुरस्कार देणे तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाचा जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविणे. अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या या नगर पालिका प्रशासनाने साताऱ्यातील साध्या रस्त्याची नोंद ठेवली नाही. असे असताना नवीन बांधकाम परवाने देवून अनेकांचे उकळ पांढरे केले आहे. त्यातूनच कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचे पंधरा लाख रुपये निविदा तून हे लाच प्रकरण घडले असून उप मुख्यधिकारी धुमाळ हे लाच घेताना सापडले आहेत. त्याच्या लाचेतून जे लाभार्थी आहेत. त्यांच्या पर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सातारा नगर पालिके विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आल्या होत्या पण, ठोस उपाययोजना होत नसल्याने अखेर लाच प्रकरण घडल्याची चर्चा होत आहे.घंटा गाडी लाच प्रकरणापूर्वी साताऱ्यातील घंटा गाडी ठेकेदार राजू नलावडे यांनी दिड वर्षांपूर्वी सातारा नगर पालिकेत उपोषण करून भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले होते. पण, त्यांना कोणाची साथ मिळाली नव्हती. आता लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रकाशझोत टाकण्यास सुरुवात केल्याने अनेक सातारकरांनी नवल व्यक्त केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!