दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । सातारा । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
मंगळवार, दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.05 वा. मुंबई येथून हेलिकॉप्टरने प्रयाण.
सकाळी 10 वा. फोर ओक्स हेलिपॅड, महाबळेश्वर, जि. सातारा येथे आगमन, नंतर मोटारीने प्रयाण.
सकाळी 10.10 वा. हॉटेल ड्रिमलॅण्ड, महाबळेश्वर येथे आगमन, व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन. नंतर मोटारीने प्रयाण.
सकाळी 11.20 वा. फोर ओक्स हेलिपॅड, महाबळेश्वर, जि. सातारा येथे आगमन.
सकाळी 11.25 वा. हेलिकॉप्टरने कार्ले हेलिपॅड जि.रायगड कडे प्रयाण.