उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या सर्वांना शुभेच्छा


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ईद-ए-मिलाद’च्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून ‘ईद’च्या निमित्ताने समाजातील गरजू, गरीब बांधवांना आपल्या आनंदात सहभागी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. मोहम्मद पैगंबर यांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘ईद’च्या निमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्तानं साजरा होत असलेला ‘ईद-ए-मिलाद’चा सण हा समाजात मोहम्मद पैगंबर यांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाचं संदेश घेऊन जाईल. मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील. यंदा कोरोनाचं संकट कमी होत असलं तरी, ‘ईद-ए-मिलाद’चा सण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करीत, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेत साजरा करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!