प्रक्रिया पूर्ण करुनही वीज कनेक्शनपासून वंचित; मांगोबामाळ येथील सचिन मोहिते यांची व्यथा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’अंतर्गत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करुन फलटण तालुक्यातील मांगोबामाळ (विडणी) येथील सचिन दशरथ मोहिते वीज कनेक्शनपासून वंचित राहिले आहेत.

याबाबत सचिन दशरथ मोहिते यांनी सांगितले की, सरदहू योजनेअंतर्गत घरगुती वीज कनेक्शन मिळण्यासाठी दि.9 ऑगस्ट 2021 रोजी आपण कोटेशनचे रुपये 250/- आपण भरलेले आहेत. ‘मीटर इन्स्टॉल्ड’ असा महावितरणचा मेसेजही फोनवर आला आहे. 202290509965 हा आपला ग्राहकक्रमांक आहे. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून वीज कनेक्शनसाठी महावितरणच्या विडणी येथील कार्यालयात आपण हेलपाटे मारत असून या ठिकाणच्या अधिकार्‍यांकडून आपल्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे, सचिन मोहिते यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!