उद्योग व्यवसाय बंद पाडण्याची भाषा करणार्‍यांना हद्दपार करा : श्रीमंत विश्‍वजीतराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘तालुक्यातील कमिन्स इंडिया, दत्त इंडिया या उद्योग व्यवसायाच्या विरोधात समोरचे उमेदवार भूमिका घेत असून हे व्यवसाय बंद पाडण्याची भाषा ते करत आहेत. यावरुन त्यांची वाटचाल तुम्ही लक्षात घ्या; आणि वेळीच त्यांना तालुक्याच्या राजकारणातून हद्दपार करा’’, असे आवाहन फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर आपल्या ‘गाव भेट दौर्‍या’ प्रसंगी मतदारांना करत आहेत.

फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ श्रीमंत विश्‍वजीतराजे यांनी गाव भेट दौर्‍यावर जोर दिला असून गावोगावी पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य मतदार यांच्याशी कोपरा सभा, बैठका घेवून ते संवाद साधत आहेत.

‘‘स्थानिक उमेदवार असल्यामुळे तुम्ही लोकसभेला माजी खासदारांदा मताधिक्य दिलं. प्रत्येक निवडणूकीला मतदार वेगळा विचार करत असतो. आज निवडणूक विधानसभेची आहे. उमेदवाराची तुलना जर केली तर लगेच आपल्याला समजेल की विजयी कुणाला करायचं आहे. कमिन्सला कुलूप लावायची भाषा ते करतायत. ज्या दत्त इंडियामुळे कामगारांचा, शेतकर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागलाय; त्या कारखान्याविरोधात आंदोलन करायची भाषा ते करत आहेत. यावरुन त्यांची वाटचाल तुमच्या लक्षात आली असेल. तीन – तीनदा आडनांव बदलायचं कारण सुद्धा तुम्हाला समजलं असेल. त्यामुळे आजवर तालुक्याच्या विकासात कुणी जास्त योगदान दिलं आहे, कुणी जास्त कष्ट घेतले आहेत, कोण आपल्या सुख-दु:खात सहभागी झाले आहे या सगळ्याचा तुम्ही घरातल्या कुटूंबियांसमवेत, मित्रांसोबत बसून विचार करा आणि स्थानिक गटाच्या विचारसरणीच्या लढ्यात कुणाला साथ द्यावची याचा निर्णय घेवून आ.दीपक चव्हाण यांना विजयी करा’’, असेही आवाहन श्रीमंत विश्‍वजीतराजे करीत आहेत.

‘‘निवडणूक म्हटल्यावर टिका – टिपणी होणारच. पण समोरच्या उमेदवाराकडून त्यांच्या विकासाच्या काय कल्पना आहेत? हे मांडण गरजेचं असताना ते उद्योग व्यवसाय बंद पाडण्याची भाषा बोलत आहेत. सुरुवातच चुकीची झाल्यावर जनता तुम्हाला कशी निवडून देईल?’’, असा सवालही श्रीमंत विश्‍वजीतराजे मतदारांसमोर उपस्थित करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!