स्थैर्य, सातारा, दि. 08 : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांना पडला आहे. शिक्षण विभागाने सर्व पर्याय तपासून कोदड संसर्ग नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळतात शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शहरी भागात एक दिवस आड शाळा सुरू करण्याचा पर्याय ठेवला. त्यामुळे 15 जून पासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला असून आता केवळ राज्यशासनाच्या सूचनेची वाट पाहत आहे.
Covid-19 पार्श्वभूमीवर जून महिना सुरू झाला तरी शाळा सुरू करण्याबाबत पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती.त्यामुळे शाळा कशा सुरू करायच्या याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसांपासून बैठका घेऊन चर्चा करून शाळा सुरू करताना कोणत्या उपाययोजना करायच्या याचा आराखडा तयार केला आहे. त्यापूर्वी सर्व शाळांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली होती. त्यातील माहितीच्या आधारे शिक्षण विभागाने सर्व तयारी केली आहे.त्यानुसार 15 जून रोजी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज आहे पण त्यासाठी काही नियमावली असणार आहे.
ज्या ठिकाणी करोना चा संसर्ग नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागातील शाळा नियमितपणे सुरू केल्या जाणार आहेत. परंतु त्यासाठी प्रत्येक गावातील ग्राम समिती व ग्राम शिक्षण समितीला अधिकार देण्यात आला आहे. मुलांना हॅन्ड सेमी टायझर, मास्क, वर्गखोल्यांची निर्जंतुकीकरण आदी गोष्टींचा समावेश आहे.ग्राम समिती त्यांच्या गावातील शाळा एक दिवसाआड किंवा नियमित सुरू करण्यास परवानगी देऊ शकते. पहिल्या टप्प्यात प्राथमिक शिक्षण विभागाच्या ग्रामीण भागातील 65% तर माध्यमिक व उच्च माध्यमिक च्या 55 टक्के शाळा सुरू होतील असा अंदाज शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे.