दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत बोर्डो मिश्रणाचे डाळिंब पिकावर प्रात्यक्षिक करून दाखविले.
या कार्यक्रमाअंतर्गत सोनगाव, ता. फलटण येथे कृषीकन्यांनी बोर्डो मिश्रण तयार करण्याचे साहित्य जसे की, मोरचुद (कॉपर सल्फेट), चुना (लाइम) इ. रसायनाची माहिती शेतकर्यांना दिली. तसेच हे मिश्रण तयार करण्याची शास्त्रीय पद्धत शेतकर्यांसमोर सादर केली. त्यांनी हे मिश्रण फवारण्याचे फायदे जसे की, वेलवर्गीय फळझाडांवरील बुरशीजन्य रोग, द्राक्षावरील केवडा रोग, वांग्यावरील रोग नियंत्रित करण्यास मदत करते. हे मिश्रण वेलवर्गीय फळझाडांबरोबर इतर फळझाडे, सजावटीची झाडे यांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रित करते, हे सांगितले. यावेळी कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीषा पंडीत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या – हर्षल भालघरे, प्रितल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषीकन्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.