दैनिक स्थैर्य | दि. १ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी रावडी बु. (ता. फलटण) येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. शेतकर्यांसमवेत विविध विषयांवर प्रात्यक्षिक देत असताना त्यांनी पारंपरिक पद्धतीमधून आधुनिक तंत्राची जोड देऊन ठिबक सिंचन प्रणालीवर प्रात्यक्षिक दिले. प्रात्यक्षिक घेत असताना गावातील शेतकर्यांना ठिबक सिंचन प्रणालीचे महत्त्व कृषीदूतांनी सांगितले.
रावडी बु. येथे श्री. योगिराज हनुमंत बोबडे यांच्या शेतातील या प्रकल्पांतर्गत पाण्याचे व्यवस्थापन करत आहेत. त्यांनी प्रणालीच्या स्थापनेविषयी माहिती दिली. यामधून होणारे फायदे व त्यांचा अनुभव सांगितला. सर्व शेतकर्यांनी शेतात या प्रणालीचा उपयोग करावा, असा सल्ला कृषिदूतांनी दिला. पाण्याची बचत होते, खतांचा योग्य प्रमाणात वापर, उत्पादनात वाढ, खतांचा खर्च कमी होतो, पिकांनुसार खतवाटप, मनुष्यबळ कमी करते, मातीची सुपीकता वाढवते, इ. ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे आहेत, असे कृषिदूतांनी शेतकर्यांना सांगितले.
यावेळी ग्रामस्थ महादेव बोबडे, अशोक बोबडे, हनुमंतराव गायकवाड, बिभीषन पवार, गजराबाई चव्हाण, उमाबाई मदने, सपना मदने, राणी पवार, वनिता गायकवाड, विद्या गायकवाड, सुषमा बोबडे, रुक्मिणी कदम आदी शेतकरी महिला उपस्थित होत्या.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम व प्रोफेसर धायगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, ओंकार, सार्थक शेंडगे यांनी प्रात्यक्षिक पार पाडले.