धुळदेव येथे कृषिकन्यांद्वारे बागायती पिकांसाठी खड्डे खोदणे आणि भरणे यावर प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य | दि. ६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत बागायती पिकांसाठी खड्डे खोदणे आणि भरणे यावर प्रात्यक्षिक दिले.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी आंबा पीक लागवडीसाठी योग्य आकारमानाचा खड्डा खोदणे व आंबा लागवडीपूर्वी तो खड्डा विविध सेंद्रिय व रासायनिक घटक जसे की शेणखत, उसाचे पाचट, सिंगल सुपर फॉस्फेट, कार्बारिल पावडर इ.ने भरून घेणे याची माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले.

याअंतर्गत त्यांनी आंबा लागवडीसाठी योग्य आकारमानाचा खड्डा खोदणे व योग्य अंतरावर खड्डा खोदणे याचे पीक उत्पन्नासाठी होणारे फायदे इत्यादींची माहिती सविस्तर दिली. तसेच खड्डा भरण्यासाठी वापरलेल्या घटकांचे पिकाच्या निरोगी वाढीसाठी होणारे फायदेही सांगितले.शेतकर्‍यांनी या प्रत्याक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!