दैनिक स्थैर्य । दि.१८ फेब्रुवारी २०२१ । सातारा । अवघ्या दोन दिवसांनी येत असलेल्या शिवजयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस दलाच्यावतीने सातारा शहरातून संचलन करण्यात आले. या संचलनाची सुरुवात पोलीस मुख्यालयापासून करण्यात आली. हे संचलन अलंकार हॉल, राजवाडा, शनिवारचौक, शाहूचौक पोवईनाका असे संचलन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये रॅपिड ॲकशन फोर्स्सह इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
अलंकार हॉल येथे दंगा नियंत्रण पथकाने दंगा काबूची प्रात्याक्षिक करण्यात आले. यावेळी तीन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सध्या उत्तरप्रदेश, पंजाब या राज्यातील निवडणूकांबरोबरच कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाने देशातील वातावरण चांगले तापले आहे. त्यातच राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपा असा संघर्षही उफाळू लागला आहे. दोन दिवसांवर छ. शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस दलाच्यालवतीने शहरातून संचलन करण्यात आले. यामध्ये पोलीस कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. हे संचालन पोलीस मुख्यालयापासून सुरु करण्यात आले होते.