
दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२३ | सिंधुदुर्ग |
कृषी महाविद्यालय दापोली येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत गोठोस (जि. सिंधुदुर्ग) गावामध्ये कृषीदूत यांचे दि. २८ जुलै २०२३ रोजी आगमन झाले. त्यानंतर त्यांनी भात लागणीच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष चिखलात भात लागणीचे प्रात्यक्षिक केले.
हे कृषीदूत विद्यार्थी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावची शेतीविषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांचा अभ्यास करणार आहेत. विविध शेतकर्यांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाण-घेवाण करणार आहेत.
सदर गटामध्ये आदित्य खोकले, आदिनाथ चाहेर, कृष्णा बोडके, सूरज आगळे, केतन झेंडे, विशाल जगताप, विठ्ठल यदलवाड, प्रतिक शेलार, अथर्व नवले, स्वानंद निरगुडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.